नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास तीन वर्षे सक्त मजुरी | पुढारी

नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास तीन वर्षे सक्त मजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजूरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भुषण निवृत्ती घुमरे (29) असे विनयभंग करणार्‍या आरोपीचे नाव आहे.

सिडकोतील ओमकार चौक परिसरात भाडेतत्वावर राहणार्‍या भुषण घुमरे याने फेब्रुवारी 2018 रोजी पीडितेचा विनयभंग केला होता. 11 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी साडी घालण्यासाठी भुषण याच्या पत्नीकडे आली होती. पत्नी घरात नसतानाही भुषणने तिला खोटे बोलून घरात घेतले. त्यानंतर भुषणने पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पी. आर. निमसे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दिपशिखा भिडे यांनी युक्तीवाद करीत तीन साक्षीदार तपासले. आरोपीविरोधात गुन्हा शाबित झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी भुषणला तीन वर्षे कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा :

Back to top button