20 हजारांची लाच स्वीकारताना चिंचवेच्या सरपंचास अटक, मध्यस्थही ताब्यात | पुढारी

20 हजारांची लाच स्वीकारताना चिंचवेच्या सरपंचास अटक, मध्यस्थही ताब्यात

देवळा : पुढारी वृत्तसेवा : शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लाचप्रकरणी अटक होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात, परंतु, देवळा तालुक्यात प्रथमच एका सरपंचावर अशा प्रकारची कारवाई झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने मंगळवारी (दि.15) चिंचवे गावात हा सापळा यशस्वी केला.

तक्रारदाराने चिंचवे (नि) ग्रामपंचायत अंतर्गत शिवस्मारक उद्यान चौक सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले. त्याबाबतच्या काम पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी सरपंच रविंद्र शंकर पवार (40) यांनी पाच टक्केच्या अपेक्षेने 22 हजार रुपयांची मागणी केली होती. यात किशोर माणिक पवार (40) या शेतकर्‍याने मध्यस्थाची भूमिका बजावत 20 हजारात तडजोड घडवली. त्याच्या माध्यमातूनच लाच स्वीकारण्याचे ठरले होते. याबाबत ठेकेदाराने ‘लाचलुचपत’कडे तक्रार केली होती. त्यानुसार मंगळवारी सापळा रचन्यात आला. मध्यस्थाने रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. नंतर सरपंचालाही ताब्यात घेऊन देवळा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. पोलिस निरीक्षक साधना भोये-बेलगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, यानिमित्ताने टक्केवारीचे गोलमाल देखील ऐरणीवर आले आहे.

हेही वाचा :

Back to top button