पुढारी ऑनलाईन डेस्क : किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. जमावाकडून हिंसाचाराच्या घटना घडवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर किर्गिझस्तानमधील (Kyrgyz Republic) भारतीय विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
किर्गिस्तानमधील हिंसाचार घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने अॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानने शनिवारी बिश्केकमधील विद्यार्थ्यांना "घरातच राहण्याचा" सल्ला दिला. "सध्या परिस्थिती शांत आहे", तरी बिश्केकमधील वैद्यकीय विद्यापीठांच्या काही वसतिगृहांवर, जिथे भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानचे विद्यार्थी राहतात, हिंसाचाराच्या दरम्यान हल्ले झाले आहेत, असे देखील पाकिस्तानच्या (Kyrgyz Republic) मिशनने सांगितले आहे.
"आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. सध्या परिस्थिती शांत आहे, परंतु विद्यार्थ्यांना तात्काळ घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास दूतावासाशी संपर्क साधा. आमचा 24-7 संपर्क क्रमांक 0555710041 आहे," भारतीय बिश्केकमधील मिशनने ट्विट केले.
हे ही वाचा: