Monsoon : नाशिककरांनो, पुढील आठवड्यात होऊ शकते पाणी कपात; ‘हे’ आहे कारण | पुढारी

Monsoon : नाशिककरांनो, पुढील आठवड्यात होऊ शकते पाणी कपात; 'हे' आहे कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुन महिना संपत आला असला तरी, वरूण राजाची कृपादृष्टी होत नसल्याने महापालिकेकडून पुढील आठवड्यात पाणी कपातीबाबत नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. प्रभारी आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांनी याबाबतचे संकेत दिले असून, आढावा घेवून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Monsoon)

अल निनोमुळे यंदा मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने व्यक्त केल्याने, नाशिककरांवर यंदा पाणी कपातीचे गडद संकट निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतच्या उपाययोजना म्हणून जलसंपदा विभागाकडून अतिरिक्त ३०० दलघफू पाण्याची मागणी करून ते मंजूर केली आहे. त्यानुसार ऑगस्टपर्यंत पाणी पुरविणे शक्य होणार असले तरी, आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावीच लागणार आहे. अर्थात मान्सून अगोदरच बरसल्यास पाणी कपातीचे संकट टळू शकते. दरम्यान, जुन महिना संपत येत असला तरी, पावसाच्या आगमनाचे कोणतेच संकेत मिळत नसल्याने मनपा प्रशासनाकडून पुन्हा एकदा पाणी कपातीच्या निर्णयावर विचार केला जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा आढावा घेवून त्यात निर्णय घेतला जावू शकतो. (Monsoon)

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ३१ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने, नाशिककरांना अत्यंत काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास पाणी कपात केली जाणे शक्य आहे.

सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज 

संपूर्ण जून महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस सोमवारी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने नुकताच वर्तविला आहे. अंदाजानुसार धरण परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्यास नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट टळले जाऊ शकते. (Monsoon)

पुढील आठवड्यात आढावा बैठक घेवून पाणी कपात लागू करणे गरजेचे आहे काय? याबाबतचा निर्णय घेतला जाईल. पाऊस अद्यापपर्यंत बरसला नसल्याने, चिंता वाढली आहे. नाशिककरांनी पाणी जपून वापरायला हवे.

– भाग्यश्री बानायत, प्रभारी आयुक्त

हेही वाचा :

Back to top button