नाशिक : मध्यवर्ती कारागृहात कैद्यावर अत्याचार | पुढारी

नाशिक : मध्यवर्ती कारागृहात कैद्यावर अत्याचार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील मध्यवर्ती कारागृहात एक न्यायबंदी (कैदी) शौचालयात लघुशंकेसाठी गेला असता दुसऱ्या संशयित न्यायबंदीने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय रामचंद्र सोनवणे असे संशयिताचे नाव आहे. पीडित न्यायबंदीच्या फिर्यादीनुसार, सदरील घटना गेल्या बुधवारी (दि.१४) रात्री कारागृहातील सर्कल नंबर ५ मधील बॅरेक क्रमांक एकमध्ये घडली. फिर्यादी न्यायबंदी शौचालयात लघुशंकेसाठी गेला असता संशयित सोनवणे याने त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. उपनिरीक्षक काकडे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button