कोल्हापूर : सहवीज प्रकल्पातील ऊर्जेला ‘दराचा‘ ब्रेक | पुढारी

कोल्हापूर : सहवीज प्रकल्पातील ऊर्जेला ‘दराचा‘ ब्रेक

कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : साखर विक्रीतून शेतकर्‍यांना उसाचे पैसे लवकर देता येत नाहीत. यामुळे कारखाना प्रशासनाला शेतकर्‍यांच्या रोषाला बळी पडावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने कारखानदारांनी उसापासूनचे बायप्रॉटक्टची निर्मिती करावी, असे सूचवले. त्यानुसार कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉलनिर्मिती, सहवीज प्रकल्प असे प्रकल्प सुरू केले आहेत. इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना महसूल मिळतो; पण सहवीज प्रकल्पातून उत्पादित होणार्‍या विजेला जादा दर मिळत नसल्याने साखर कारखान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ‘सहवीज’च्या विजेला 10 रुपये प्रतियुनिट दर द्यावा, अशी अपेक्षा कारखानदारांची आहे.

शेतकर्‍यांना उसाचे पैसे लवकर देता यावेत, यासाठी कारखान्यांनी उपप्रकल्प सुरू केले. त्यातूनच सहवीज प्रकल्पाची उभारणी झाली; पण या प्रकल्पातून तयार होणार्‍या विजेला जो दर दिला जातो, तो किफायतशीर नाही. भांडवली खर्च आणि उत्पन्न याचा विचार करता प्रतियुनिट 1 रुपयाप्रमाणे राज्य शासनामार्फत अनुदान देण्याचा निर्णय 31 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याची अद्याप अमलबजावणी झालेली नाही. याचाही फटका कारखान्यांना बसत आहे. त्यामुळे दरवाढ मिळावी, अशी अपेक्षा आहे.

वीजनिर्मिती युनिट

एकूण वीज निर्मिती 838 कोटी
वितरण कंपनीस विक्री 472 (57टक्के)
कारखान्यात वापर 339 (43टक्के)
कारखान्यांना मिळालेले उत्पन्न 2948 कोटी

राज्याची उत्पादन क्षमता

थर्मल पावर 27,063 मे.वॅ.
न्युक्लिअर 1400 मे.वॅ.
हायडेल 3047 मे.वॅ.
इतर 10,799 मे.वॅ.
एकूण 42,409. मे.वॅ.

ऊस उत्पादनाची सद्यस्थिती

एकूण उस लागवडीखालील क्षेत्र-15 लाख हेक्टर
साखर उत्पादन-1350 ते 1400 लाख टन
येत्या हंगामात जादा बगॅस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज नियामक मंडळाने सहवीज प्रकल्पातील विजेचा दर 10 रुपये प्रतियुनिट करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button