पिंपळनेर :सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेतील भाविकांसाठी भोजनाचे वाटप | पुढारी

पिंपळनेर :सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेतील भाविकांसाठी भोजनाचे वाटप

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
चैत्रोत्सवानिमित्ताने ‘चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, प्रेमसे बोलो जय माताजीचा’ असा गजर करत पिंपळनेर शहरासह नंदुरबार, दोंडाईचा, असलोद, मंडाणे, शहादा, निजामपूर, जैताणे, दहिवेल, साक्री तालुक्यातून शेकडो भाविक सप्तश्रृंगीदेवीच्या गडावर रवाना होत आहेत. चैत्र यात्रोत्वानिमित्त अनेक वर्षापासून पिंपळनेर येथील मायंबा प्रतिष्ठानतर्फे सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याप्रमाणे यंदाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण महाराज यांच्या यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पदयात्रेकरुंना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मायंबा प्रतिष्ठानचे भक्तगणांनी पायी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी सटाणा रोडवरील जे.टी.पॉइंटजवळ भोजनासह शुद्ध पाणी औषध, थंडपेय सोबत विविध साधनसामुग्रीचे नियोजन केले. पिंपळनेर शहरातून पदयात्रा करीत भाविकांचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी ठिकठिकाणाहून भाविक वाजत गाजत गडाकडे मातेच्या जयघोष करीत भक्तीगीते गात शेलबारीमार्गे रवाना झाले आहेत. यावेळी हजारो महिला, आबालवृद्ध भाविकांनी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचा लाभ घेतला.

हेही वाचा:

Back to top button