जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप | पुढारी

जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यात निजामपूर येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ग्रामपालिकेने ग्रामनिधीतून ३२ लाभार्थ्यांना  प्रत्येकी २ हजार रुपयांचा ग्रामनिधी धनादेशाचे वाटप केले.

ग्रामनिधीतून पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना देण्याच्या तरतुदीनुसार यावेळी ४८ पैकी ३२ लाभार्थी दिव्यांगांना निधी देऊन दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. सरपंच सोनाली दीपक वाणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपालिकेत हा कार्यक्रम घेण्यात आला. निजामपूर गावात एकूण ४८ दिव्यांग असून यापूर्वी १६ दिव्यांगांना निधी सुपूर्द करण्यात आला होता. सरपंच वाणी व उपसरपंच शाम पवार, सदस्य ताहिरबेग मिर्झा, पुष्पांजली बच्छाव, परेश पाटील, रमेश कांबळे यांच्या हस्ते उर्वरित एकूण ३२ दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे ग्रामनिधी धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी जगताप, प्रहार अपंग संघटनेचे शेखर शाह, चिंधू बंडू शिंपी, गनी तांबोळी, अयुब बेग, सुनील वाणी, अभिजित शिरोडे, अल्ताफ बेग आदी उपस्थितीत होते.  प्रकाश बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले. शरद नेरकर, राजेंद्र राणे, वहाब बेग ,इरफान शेख, विनोद पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button