Nashik Crime : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराकडून महिलेचा विनयभंग | पुढारी

Nashik Crime : नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराकडून महिलेचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंभीर गुन्हा दाखल असलेल्या (Nashik Crime)  सराईत गुन्हेगाराने महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करीत मारहाण केल्याचा प्रकार सहवासनगर येथील म्हाडा वसाहतीत घडला. या प्रकरणी पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित शैलेश पवार (३१, रा. सहवासनगर) याच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी ६ च्या सुमारास संशयित शैलेशने कुरापत काढून विनयभंग (Nashik Crime)  केला व बळजबरीने पीडितेच्या घरात शिरला. पीडितेच्या मुलीसमोर त्याने काठीने मारहाण केली. मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शैलेश विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोड्याची पूर्वतयारी करण्यासारखे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button