

बदलत्या जीवनशैलीमुळे आज समाजातील डायबेटिसचे आणि पर्यायाने डायबेटिसमुळे येणार्या अंधत्वाचे प्रमाण इपाट्याने वाढत आहे. वेळेवर योग्य तपासण्या व उपचार झाले, तर डायबेटिसमुळे येणारे अंधत्वास आळा घालता येतो. ( Diabetic Eye Exam )
अगदी अलीकडची गोष्ट. एका पेशंटला परवापासून दिसायचे अचानक बंद झाले होते. डोळ्याची व नेत्रपटलाची (रेटिनाची) तपासणी केली, तर असे दिसले की, दोन्ही डोळ्यांच्या रेटिनावर (नेत्रपटलावर/पडद्यावर) डायबेटिसमुळे अगदीच जास्त नुकसान झाले होते आणि परिणामी दोन्ही डोळ्यांच्या रेटिनावर रक्तस्त्राव झाला होता. तो पेशंट म्हणाला, मला परवापर्यंत तर अगदीच चांगले दिसत होते. एकच दिवस कसे काय एवढे जास्त नुकसान होऊ शकते?
रक्तातील साखरेचे (शुगरचे) प्रमाण नियंत्रित करण्यास शरीराला येणारे अपयश म्हणजेच डायबेटिस होय. बदलत्या जीवनशैलीमुळे आज समाजातील डायबेटिसचे आणि पर्यायाने डायबेटिसमुळे येणार्या अंधत्वाचे प्रमाण इपाट्याने वाढत आहे. वेळेवर योग्य तपासण्या व उपचार झाले, या अंधत्वास आळा घालता येतो. डायबेटिसमुळे होणार्या या नेत्रपटलाच्या (रेटिनाच्या) डॅमेजला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात.
डायबेटिस किती जुना आहे, तो कंट्रोलमध्ये आहे की नाही, सोबत बीपी आहे की नाही, धूम्रपान किंवा मद्यपान करता का, रक्तातील चरबी वा किडनीचे काम बिघडले आहे का, अशा अनेक घटकांवर डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता अवलंबून असते.
1) रेटिनावर (पडद्यावर) सूज येणे -ज्यामुळे द़ृष्टी कमी होते.
2) रेटिनावर नवीन दोषयुक्त रक्तवाहिन्या (रक्ताच्या गुठळ्या) तयार होणे. यामुळे पडद्यासमोर रस्तस्त्राव होऊ शकतो किंवा पडदा सरकला जाऊ शकतो.
* लक्षणे – लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा हा की, काळापर्यंत चांगली राहू शकते आणि त्यांनतर ती अचानक कमी होते. अगदी कडेलोट केल्यासारखी! याव्यतिरिक्त समोरची द़ृष्टी मंदावणे, रंग फिके पडणे, प्रतिमा वेड्यासारखी दिसणे. डाग, जाळे, ठिपके तरंगताना दिसणे व द़ृष्टी पूर्णत: निघून जाणे ही लक्षणे दिसू शकतात.
* तपासण्या : पडद्याच्या विविध व आधुनिक तपासण्यांद्वारे पडद्यावरील नेमका डॅमेज निश्चित केला जातो.
* उपचार : रेटिनावरील नुकसानीच्या तीव्रतेनुसार विविध उपचार प्रणाली उपलब्ध आहेत.
1) डायबेटिसचे नियंत्रण.
2) लेसर ट्रिटमेंट : लेसर किरणांच्या ट्रिटमेंटमुळे पडद्यावरील रक्ताच्या गुठळ्या सुकतात व पर्यायाने द़ृष्टी अचानक निघून जाण्याचे टळते.
3) इंजेक्शन- अत्याधुनिक इंजेक्शन्समुळे द़ृष्टी लक्षणीय प्रमाणात सुधारण्यास मदत होते.
4) ऑपरेशन – रेटिनावरील नुकसान अगदी पुढच्या स्टेजचे असेल, तर ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. आजच्या आधुनिक ऑपरेशन प्रणालीमुळे सक्सेस रेट लक्षणीयरीत्या वाढला आहे आणि ऑपरेशननंतर होणारा त्रास खूप कमी झाला आहे.
शास्त्र कितीही प्रगत झाले असले, तरीही बरेचदा उपचारांनी पुढे होणारा डॅमेज टाळता येतो. परंतु, झालेला डॅमेज परत सुधारता येत नाही. त्यामुळे लवकर निदान होणे गरजेचे असते. यासाठी अत्यंत गरजेचे आहे की, डायबेटिसच्या सर्व रुग्णांनी द़ृष्टीच्या समस्या असो अथवा नसो, नियमितपणे रेटिनाची तपासणी रेटिना सर्जनकडून करून घ्यावी म्हणजे या सुंदर जगाच्या आपल्याला दीर्घकालापर्यंत अस्वाद घेता येईल.
-डॉ. पंकज मुत्तेपवार