नाशिक : पिंजऱ्यातून बिबट्याच्या बछड्याची खणखणीत डरकाळी, पाहा व्हिडीओ | पुढारी

नाशिक : पिंजऱ्यातून बिबट्याच्या बछड्याची खणखणीत डरकाळी, पाहा व्हिडीओ

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील ठाणगावच्या भिकरवाडी परिसरात शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकला. हा जेरबंद बिबट्या पिंज-यातूनही डरकाळी फोडत होता.

गेल्या आठवडाभरापासून भिकरवाडी परिसरातील वस्त्यांवर बिबट्या व बछड्यांचा वावर आहे. बिबट्याने भरदिवसा कोंबड्या फस्त केल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली. तीन दिवसांपूर्वी सीताराम शंकर शिंदे यांच्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी त्यात बिबट्या अडकला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी वस्तीवर पोहोचले. रात्री दहाच्या सुमारास जेरबंद बिबट्या माळेगाव मोहदरी वनोद्यानात ठेवण्यात आला.

दरम्यान बछडा जेरबंद झाल्यानंतर याच भागात मादी बिबट्या असण्याची शक्यता असल्याने वनविभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र परिसरातील काही तरुणांनी खबरदारीच्या इशाऱ्याला झुगारून हकनाक गोंधळ घातला. व परिसरातील रहिवाशांचा जीव धोक्यात येईल असे कृत्य केल्याची तक्रार विजय शिंदे यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ –

 

Back to top button