जळगाव: रागाच्या भरात पतीकडून पत्नीचा खून | पुढारी

जळगाव: रागाच्या भरात पतीकडून पत्नीचा खून

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना  यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे सायंकाळी घडली. खून करणारा संशयित पती हा स्वत:हून पोलीसात हजर झाला. आरोपीस खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, इंदूबाई प्रकाश पाटील (वय-५८) रा. थोरगव्हाण ता. यावल जि.जळगाव येथे पती प्रकाश पांडूरंग पाटील, विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह राहतात. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.

रविवार २७ फेब्रुवारी रोजी मुलगा आनंद हा जळगाव येथे कामासाठी गेला होता. तर लहान मुलगा एका गल्लीत वेगळा राहतो. त्यामुळे प्रकाश पाटील आणि पत्नी इंदूबाई पाटील हे दोघेच घरी होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पती पत्नी यांच्यात कौटूबिक कारणावरून तीव्र वाद झाला. यात संतापाच्या भरात प्रकाश पाटील यांनी पत्नी इंदूबाई पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडका घातला. यात इंदूबाई पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शेजारच्या लोकांनी तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले असतां वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी पती प्रकाश पाटील हा खून केल्यानंतर स्वत:हून यावल पोलीस ठाण्यात हजर झाला.

हेही वाचा

Back to top button