

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीने शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिचा साधेपणा आणि अभिनय पाहिल्यानंतर चाहत्यांना अभिनेत्रीचे वेड लागले.
या चित्रपटातील तिची शाहरुख खानसोबतची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती. दीपिका पदुकोण सध्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत असून या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत ऑनस्क्रीन दिसणार आहे. अशा परिस्थितीत दीपिका पदुकोणने स्वतः किंग खानकडून मिळालेल्या एका सल्ल्याबद्दल सांगितले.
फिल्मफेअरमध्ये बोलताना दीपिका पदुकोण म्हणाली, "शाहरुख खानकडून मला मिळालेला सर्वात चांगला सल्ला म्हणजे नेहमी अशा लोकांसोबत काम करा ज्यांना तुम्ही ओळखता. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवत असता कारण तुम्ही ज्यावेळी तुम्ही एखादा चित्रपट बनवत असता त्यावेळी जीवनाचा आनंद घेत असता, आठवणी जपत असता आणि अनुभव घेत असता."
दरम्यान, अभिनेत्रीने हे देखील उघड केले की तिला सर्वात वाईट सल्ला मिळाला होता, जेव्हा ती 18 वर्षांची होती तेव्हा कोणीतरी तिला ब्रेस्ट इम्प्लांट करण्यास सांगितले. यावेळी ही अभिनेत्री म्हणाली, 'मला अनेकदा प्रश्न पडतो की मी हे प्रकरण गांभीर्याने का घेतले नाही?'
दीपिका पदुकोण 'गेहराईं' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे सारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. हा चित्रपट शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केला होता.
हेही वाचा