धुळ्यात आकडे टाकून केली जातेय वीजचोरी ; ९ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

धुळ्यात आकडे टाकून केली जातेय वीजचोरी ; ९ जणांवर गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा : वीजबिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही आकडे टाकून चोरीची वीज वापरणाऱ्या नऊ जणांवर शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा या मोहिमेत खंडित केला जात आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही कुणी अनधिकृतपणे वीज वापरत आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार काही ग्राहक आकडे टाकून वीज चोरी करताना आढळून आले.

विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे. याप्रकरणी महावितरणच्या वरूळ कक्षाचे सहायक अभियंता दिनेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात पुंडलिक गोपीचंद पाटील, नाना पौलाद गिरासे, दिलीप सीताराम पाटील, भटू बळीराम कोळी, जगदीश देविदास सावळे, रमेश दंगल कोळी, संतोष भटू कोळी, दिलीप उत्तम मराठे व योगेश निंबा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button