हार्दिक पंड्या विषयी शार्दुल ठाकूरचे मोठे वक्तव्य, म्हणाला… | पुढारी

हार्दिक पंड्या विषयी शार्दुल ठाकूरचे मोठे वक्तव्य, म्हणाला...

अहमदाबाद पुढारी वृत्तसेवा :  माझी आणि हार्दिक पंड्याची फलंदाजीची शैली वेगळी आहे, त्यामुळे माझी त्याच्याशी कसलीच स्पर्धा नाही, तो तंदुरुस्त होऊन लवकरच संघात परतेल, असे स्पष्ट मतभारताचा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर याने व्यक्‍त केले. शार्दुल ठाकूरने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी स्वत:ला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मानतो. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी स्वत:ला सिद्ध करू इच्छितो. फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर धावा करणे, मोठी भागीदारी करणे आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देणे महत्त्वाचे असते. यामुळे खूप फरक पडतो, असे शार्दुल ठाकूरने सांगितले. (शार्दुल ठाकूर)

यावेळी शार्दुल ठाकूरला हार्दिक पंड्याचा पर्यायी खेळाडू म्हणून तुझ्याकडे पाहिले जाते का? असा प्रश्‍न विचारला असता शार्दुल म्हणाला, माझी हार्दिकसोबत कोणतीच स्पर्धा नाही, हार्दिक तंदुरुस्त होऊन संघात लवकरच परतेल. आमच्या दोघांची फलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. हार्दिक पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. मी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर येतो. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कोणतीच स्पर्धा नाही. मी त्याची जागा घेण्याचा विचार करत नाही. (शार्दुल ठाकूर)

हेही वाचलत का?

Back to top button