shahrukh : मार्चपासून हिराणींच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार एसआरके | पुढारी

shahrukh : मार्चपासून हिराणींच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार एसआरके

पुढारी ऑनलाईन

‘झीरो’ फ्लॉप झाल्यापासून शाहरूख खान मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. सध्या त्याचे दोन प्रोजेक्ट सुरू आहेत. एक तर बहुचर्चित आणि त्याच्या पुनरागमनाचा चित्रपट म्हणून पाहिला जात असलेला अ‍ॅक्शन थ्रिलर ‘पठाण’ आणि दुसरा म्हणजे दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारचा ‘लॉयन.’ सध्या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. त्यातच मध्यंतरी बातमी आली होती की, दिग्दर्शक राजकुमार हिराणींच्या चित्रपटातही शाहरूख असणार आहे. हा चित्रपट सोशल कॉमेडी असणार आहे. पंजाबमधून अवैधरीत्या कॅनडात स्थलांतर करणार्‍यांबाबतचा हा चित्रपट आहे. आता माहिती आहे की, शाहरूख या चित्रपटाच्या शूटिंगला मार्चपासून सुरुवात करत आहे. मुंबईच्या फिल्मसिटीत त्यासाठी पंजाबच्या एका गावाचा सेट बनविण्याचे नियोजन सुरू आहे. चित्रपटात तापसी पन्‍नूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

Back to top button