नाशिक : घरात शिरुन तब्बल साडेबारा तोळे सोन्यावर चोरट्याचा डल्ला ; गोंविदनगर भागातील घटना | पुढारी

नाशिक : घरात शिरुन तब्बल साडेबारा तोळे सोन्यावर चोरट्याचा डल्ला ; गोंविदनगर भागातील घटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गोविंद नगर परिसरात चोरट्याने चोरी करून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ४ ते १७ जानेवारी दरम्यान, घडली. मल्हार सिताराम आगरकर (८३, रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने घरात शिरून घरातील सुमारे साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button