Asaduddin owaisi : “घरात पत्नी असेल तर डोकं शांत राहतं” | पुढारी

Asaduddin owaisi : "घरात पत्नी असेल तर डोकं शांत राहतं"

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना एमआयएमचे प्रमुख   (Asaduddin owaisi) असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिमांना उद्देशून म्हणाले की, “राजकीय धर्मनिरपक्षतेपासून दूर रहा.” शिवाय राज्य सरकारवरदेखील त्यांनी निशाणा साधला.कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या तरुणांना उद्देशून त्‍यांनी केलेले वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

तरुणांना उद्देशून ओवैसी म्हणाले की, “लग्न करणार ना? विनालग्नाचे राहू नका. बॅचरल लोक खूप त्रास देत आहेत. घरात पत्नी असेल तर माणसाचं डोकं शांत राहतं.” ओवैसी हे तरुणांना विचारत होते की, आपल्या मुलांना अडाणी आणि गरिबीमध्ये ठेवण्याची तुमची इच्छा आहेत का? ते म्हणाले की, “जे युवक सध्या १८-१९ वर्षांचे आहेत. लवकरच त्यांचे लग्न होईल. त्यांना मुला होतील; पण, लग्न करणार ना? का तुमची इच्छा आहे की तुमच्या मुलांना त्यांचे अधिकार मिळू नयेत?”

असदुद्दिन ओवैसी (Asaduddin owaisi) पुढे म्हणाले की, “धर्मनिरपेक्षतेने मुस्लिमांना काय दिले? आम्हाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळाले नाही. निर्णय घेण्यामध्ये आपली भागीदारी नव्हती. कोणता अधिकारही नव्हता. त्यामुळे धर्मनिरपेक्षता या शब्दाने मुस्लिमांना नुकसान पोहोचवलेले आहे. महाराष्ट्रात केवळ २२ टक्के मुसलमान प्राथमिक विद्यालयात प्रवेश घेत आहेत. तर, ४.९ टक्के मुसलमान पदवीचं शिक्षण पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रात ८३ टक्के मुसलमान भूमिहिन आहेत” , असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button