

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार रजनीकांत यांचा आज ७१ वा वाढदिवस. त्यांचे चाहते जगभर पसरले आहेत. सोशल मीडियावर ते रजनीकांत यांना शुभेच्छा पाठवत आहेत. #HBDSuperstarRajinikanth ट्विटरवर ट्रेंडही सुरु आहे.भारतीय माजी क्रिकेटर हरभजन सिंगनेही रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत; पण या शुभेच्छा थाेड्या हटके आहेत. त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
हरभजनने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्याने आपल्या छातीवर रजनीकांत यांचा टॅटू काढला आहे. यासह त्याने तमिळमध्ये कॅप्शन दिली आहे. 80 आणि 90 च्या दशकात तुमचे नाणे चालायचे. चित्रपटसृष्टीतील एकमेव सुपरस्टार नेते रजनीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अस या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
रजनीकांत हे नुकतेच मेंदूतील रक्तप्रवाहाच्या समस्येतून बरे झाले आहेत. गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या विश्वासू व्हीके शशिकला यांनी त्यांची भेट घेतली हाेती.
१९९५ मध्ये दिवाळी रजनीकांत यांचा 'मुथु' रिलीज झाला होता. आता 'अन्नाथे' हा रिलीज झाला आहे. जो तमिळनाडू आणि अन्य राज्यातील चित्रपट गृहांमध्ये मागिल महिन्यात रिलीज झाला होता.
प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर काही दिवसांनी रजनीकांत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. रजनीकांतने त्याच्या ट्विटर हँडलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो शेअर केली. शुभेच्छा मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. अस त्यांनी यात म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?