लग्‍नाच्‍या पहिल्‍या रात्री पत्‍नीसमोर ‘अशी’ अट ठेवली की…, प्रकरण थेट पोलिस ठाण्‍यात पोहचले | पुढारी

लग्‍नाच्‍या पहिल्‍या रात्री पत्‍नीसमोर 'अशी' अट ठेवली की..., प्रकरण थेट पोलिस ठाण्‍यात पोहचले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
कोणत्‍याही तरुणीसाठी लग्‍न ही नवआयुष्‍याची सुरुवात. नवआयुष्‍यातील नवस्‍वप्‍न ती रंगवत असते. झारखंडमधील एका तरुणीनेही अशीच स्‍वप्‍न पाहतं आपल्‍या नवजीवनाला सुरुवात केली. मात्र लग्‍नाच्‍या पहिल्‍या रात्री तिच्‍या नवर्‍याने अशी काही अट ठेवली की, तिच्‍या पायाखालील जमीनच सरकली. तिला सुरुवातीला वाटलं की, तो चेष्‍टामस्‍करी करत असेल; पण त्‍याने आपली अट खूपच गांभीर्याने घेतली. या अटीमुळे एका मुलीचे उद्‍ध्‍वस्‍त झालं. अखेर या तरुणीने पतीसह त्‍याच्‍या कुटुंबाविरोधात पोलिस ठाण्‍यात धाव घेतली.

लग्‍नाच्‍या पहिल्‍या रात्री पतीने घातलेल्‍या अटीमुळे तरुणीचे आयुष्‍यच उद्‍ध्‍वस्‍त

झारखंडमधील तरुणी पल्‍लवी हिचे एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्‍या तरुण जयमाल्‍य मंडल याच्‍याशी १८ जून २०१८ रोजी मोठ्या थाटामाटात लग्‍न झालं. लग्‍नाच्‍या पहिल्‍याच रात्री त्‍याने आपल्‍या पतीसमोर एक अटी ठेवली की, तिने दोन वर्षात आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) होवून दाखवावे. दोन वर्षात ही अट पूर्ण केली तरच आपलं लग्‍न टिकले. अन्‍यथा. मी तुझ्‍याशी कोणताही संबंध ठेवणार नाही.

पतीचे अट ऐकून सुरुवातीला पल्‍लवीला वाटलं की, तो चेष्‍टामस्‍करी करत असेल. मात्र लग्‍नाच्‍या दुसर्‍याच दिवशी पती नोकरीसाठीच्‍या मुलाखतीला जातो असे सांगून निघून गेला. यानंतर काही दिवसांनी तो परत घरी आला. मात्र त्‍याची अट कायम होती. त्‍याने पल्‍लवीबरोबरील सर्व संबंध तोडले. याच काळात पल्‍लवीच्‍या सासू, सासरा, दीर आणि नंदन यांनीही तिचा मानसिक छळ केला. दिवसोंदिवस हा छळ वाढला. पतीही आपल्‍या अटीवर कायम राहिला. पत्‍नीची पोलिस ठाण्‍यात धाव अखेर मानसिक छळाला कंटाळून पल्‍लवीने पोलिस ठाण्‍यात तक्रार केली.

पती एमबीए असून बँकेत सहायक व्‍यवस्‍थापक पदावर कार्यरत आहे. मागील दोन वर्ष आईवडिलांनी समजवले म्‍हणून मी सासरच्‍या लोकांकडून होणारा छळ सहन केला. मात्र सहनशीलतेचा अंत झाल्‍यानंतर पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल केल्‍याचे पल्‍लवीने माध्‍यमांशी बोलताना सांगितले.पल्‍लवीच्‍या पतीने लग्‍नापूर्वीच त्‍याची अट सांगायला हवी होती. त्‍याने ही अट सांगितली असती तर आम्‍ही कधीच पल्‍लवीचे लग्‍न अशा व्‍यक्‍तीबरोबर केले नसते. असे तिच्‍या वडिलांनी सांगितले. आता तक्रार मागे घेण्‍यासाठी पल्‍लवीच्‍या सासरची मंडळी धमकी देत आहेत. पल्‍लवी व तिचे वडील न्‍याय मिळावा म्‍हणून पोलिस ठाणे आणि न्‍यायालयात फेर्‍या मारत आहे. पतीच्‍या एका अटीमुळे माझ्‍या मुलीचे जीवन उद्‍ध्‍वस्‍त झालंय आता आम्‍ही न्‍यायाच्‍या प्रतीक्षेत आहोत, हे पल्‍लवीच्‍या वडिलांचे हतबल उद्‍गार एका मुलीच्‍या आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍याची सांगतात. आता या दोघांना न्‍याय मिळणार का, याची चर्चा होत आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button