

सोलापूर : पुढारी ऑनलाईन : सोलापुर जिल्ह्यातील बार्शी- कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवल ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. (Barshi- Kurduwadi accident)
या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Barshi- Kurduwadi accident : दरम्यान हा अपघात पहाटे 4 वाजता घडला असून तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.