कॅटरीना कैफने सासऱ्यासोबत 'या' चित्रपटात केलंय काम; पहा कोणता चित्रपट | पुढारी

कॅटरीना कैफने सासऱ्यासोबत 'या' चित्रपटात केलंय काम; पहा कोणता चित्रपट

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन 

कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल नुकतच लग्‍नबंधनात अडकले. माध्यमांपासून लांब राहत या दोघांनी हा विवाहसोहळा पार पाडला. या सोहळ्याला अनेक सिनेकलाकारांना आमंत्रण होते. या दरम्‍यान लग्‍नाच्या बातम्‍यांमधून एक बातमी अशी समोर आली. ज्‍यामुळे या दोघांच्या चाहत्‍यांची उत्‍सुकता चारपट वाढली.

कॅटरीनाने याआधी केव्हाही विकी कौशल सोबत काम केलेलं नाही. मात्र कॅटरीनाने विक्‍कीचे वडील म्‍हणजेच शाम कौशल (Sham Kaushal) यांच्या सोबत काम केलं आहे. होय, या दोघांनी फैंटम (Phantom) चित्रपटात सोबत काम केलं आहे. हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सैफ अली खान हा प्रमुख भूमीकेत होता. कबीर खानने हा चित्रपट दिग्‍दर्शित केला होता.

कॅटरीनाने या चित्रपटात रॉ एजंटची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि बाकीचे लोक गोळीबार करत असतात. यावेळी कॅटरीनाला लपावे लागते. कॅट सांगते, मी आणि सैफ जीपमध्ये होतो. यावेळी सीरियन सेना आमचा पाठलाग करत असते. या सीनवेळी ॲक्‍शन डायरेक्‍टर (शाम कौशल) यांनी हा सेट उभारला होता. जशा गोळ्या झाडल्‍या जातील तसे कॅटरीनाला लपायचे होते. मात्र यावेळी कॅटरीना म्‍हणाली, मी एजंटच्या भूमिकेत आहे त्‍यामुळे मी देखील फाइट करू शकते. कॅटरीनाच्या या म्‍हणण्यावर कबीर खान आणि बाकीचे लोक सहमत झाले.

हे वाचा :

Back to top button