Maharashtra Politics : ठाकरे गटाकडून आजच्‍या महा पत्रकार परिषदेचा टीझर रिलीज  | पुढारी

 Maharashtra Politics : ठाकरे गटाकडून आजच्‍या महा पत्रकार परिषदेचा टीझर रिलीज 

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार पात्र-अपात्रतेच्या लढाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल देताना, शिवसेना पक्ष हा बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल गुरुवारी (दि.११) दिला.  शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही नार्वेकर यांनी वैध ठरवली तसेच शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरविले. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आज (दि.११) महा पत्रकार परिषद घेत आहेत. ठाकरे गटाने याचा टीझर रिलीज करत म्हटलं आहे की, “कोंबडं झाकण्याचा कितीही प्रयत्न केलात, तरी सूर्य उगवायचा राहणार नाही. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : कोंबडं झाकण्याचा कितीही प्रयत्न…

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्य़ा ‘X’ खात्यावर आज (दि.१६) होणाऱ्या जाहीर महा पत्रकार परिषदेचा टीझर शेअर करत म्हटलं आहे की,”आमची बाजू संविधानाची आहे, लोकशाहीची आहे आणि सत्याची आहे. त्यामुळे कोंबडं झाकण्याचा कितीही प्रयत्न केलात, तरी सूर्य उगवायचा राहणार नाही. जनता न्यायालय! सत्य ऐका आणि विचार करा!”

पंचवीस मिनीटांच्या टीझरमध्ये म्हटलं आहे की, “घटनेला पायदळी तुडवून तुम्ही लाख खोट्याच्या बाजूने निकाल द्याल. पक्ष चोरायचा प्रयत्न कराल; पण कोंबड कितीही झाका, सूर्य उगवायचा राहणार नाही. खोट्याचं खरं होणार नाही. आमची बाजू संविधानाची आहे, लोकशाहीची आहे आणि सत्याची आहे. हीच बाजू आज जनतेच्या न्यायालयात मांडली जाणार, दुपारी चार वाजता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एन.एस.सी.आयय वरळी-मुंबई. जनता न्यायालय! सत्य ऐका आणि विचार करा! शिवसेना पक्ष प्रमुखश्री उद्धव ठाकरे

हेही वाचा 

Back to top button