Sharad Pawar Video : “कोंढाजी वाघ आहेत का?” ; शरद पवारांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल | पुढारी

Sharad Pawar Video : "कोंढाजी वाघ आहेत का?" ; शरद पवारांचा 'तो' व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शऱद पवार यांचा एका सभेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सभेदरम्यान सभेत उपस्थित असणाऱा एक कार्यकर्ता घोषणा देत असताना शरद पवार त्याच्या आवाजावरुन त्याला नावानिशी ओळखतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होताना दिसत आहे. कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Sharad Pawar Video)

Sharad Pawar Video : फक्त आवाजावरुन ओळखलं कार्यकर्त्याला… 

शऱद पवार हे राजकीय जीवनात भूषवलेल्‍या विविध पदांसह त्‍यांच्‍या प्रचंड जनसंपर्कासाठी ओळखले जातात. तसेच आपल्‍या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना नावाने ओळखणारे नेते, अशीही त्‍यांची ओळख आहे. शरद पवार यांचा सध्‍या व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शरद पवार बोलण्यासाठी उभा आहेत आणि उपस्थित कार्यकर्त्यांपैकी काहीजण शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाचा जयजयकार करत आहेत. एक कार्यकर्ता घोषणा देत असताना शरद पवार उपस्थितांना विचारत आहेत की,”कोंढाजी वाघ आहेत का ?” शरद पवार यांनी त्या कार्यकर्त्याच्या फक्त नावावरुन त्याला ओळखलं आणि विचारलं कोंढाजी वाघ आहेत का ? असं विचारताच उपस्थितांनी एकच जल्लोष करताना दिसतात. दरम्यान शरद पवार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होताना दिसत आहे. कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

अस्सल लोकनेता घडतो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन

खासदार सुप्रिया सुळे यांनीही शरद पवार यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “अस्सल लोकनेता घडतो ते कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, कार्यकर्ते हे त्याचं विस्तारीत कुटुंबच जणू. गेली सहा दशके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पवार साहेबांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. आपुलकी, विश्वास आणि परस्परांप्रती अतूट निष्ठा यामुळे हे नाते दिवसेंदिवस आणखी दृढ होत आहे. कानावर आवाज पडला तरी तो कोणाचा हे त्यांना ओळखता येतं कारण आमच्या नेत्याची नाळ या सर्वसामान्य मायबाप जनतेशी घट्ट जोडलेली आहे. आमचा नेता आमच्या पक्षाचा प्रथम कार्यकर्ता आहे.”

हेही वाचा 

Back to top button