Maharashtra Politics : नाना पटोलेंचा देवरांसह शिंदे-भाजप सरकारवर निशाणा, म्‍हणाले… | पुढारी

Maharashtra Politics : नाना पटोलेंचा देवरांसह शिंदे-भाजप सरकारवर निशाणा, म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून (दि.१४) प्रारंभ होत असतानाच अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले मुरली देवरा यांचे पुत्र, काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवरांसह शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics :  भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “आजपासून सुरु होणा-या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटी सारख्या केंद्रीय संस्थांची भीती दाखवून आमच्या काही सहकार्‍यांना आपल्यासोबत घेत आहेत. काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत; पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबत असंवैधानिक शिंदे भाजप सरकारचाही शेवटही होणार आहे.”

कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही “आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे” म्हटलं आहे.

मिलिंद देवरांचे ट्विट

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज एक्स पोस्ट करून याबाबत माहिती दिली. “आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button