ब्रेकिंग! जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण | पुढारी

ब्रेकिंग! जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डेंग्यूची लागण झाल्याची माहिती त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. आज (दि. १४) सायंकाळी उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये त्यांना डेंग्यूची लक्षणे अढळल्याचे निष्पण्ण झाले. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

जयंत पाटील यांची कालपासून तब्येत बिघडलेली होती. याबाबत त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत त्यांना ताप आल्याची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याने त्यांचे दैनंदिन कामकाज आणि सर्व कार्यक्रम यामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन.

हेही वाचा

Back to top button