Narendra Modi vs Sharad Pawar : PM मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले… | पुढारी

Narendra Modi vs Sharad Pawar : PM मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिर्डी दौऱ्यात जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता; पण या टीकेवर शरद पवार काय म्हणणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज (दि.२८) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. (Narendra Modi vs Sharad Pawar)

Narendra Modi vs Sharad Pawar : कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला

माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी २००४ ते २०१४ या कार्यकाळातील कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयाचे वाचन केले. ते म्हणाले की, “पंतप्रधान पद हे एक संवैधानिक पद आहे. या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी. २००७ ते २०१४ या काळात माझ्याकडे देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी होती. २००४ ला देशात अन्नधान्याची टंचाई होती. माझ्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव वाढला. माझ्या काळात शेतकऱ्यांच अन्नधान्य उत्पादन वाढलं. माझ्या काळातील दोन योजनांनी कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला. कृषी क्षेत्रासह मत्स्यपालनाकडे विशेष लक्ष दिलं.मत्स्यपालनव्यवसायासाठी वेगळ्या महामंडळाची स्थापना केली. तांदळाच्या उत्पादनात भारत अव्वल आला. त्याचबरोबर गहु उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानी होता. तांदुळ आणि गहु उत्पादनात देशाचा नावलौकीक झाला. शेतकरी जीवन संपवायचे, ही समस्या रोखण्यासाठी  शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. अनेक कृषी योजना सुरु केल्या.”

शरद पवार कृषिमंत्री असताना पैसे मिळणं दलालांवर अवलंबून : पंतप्रधान मोदी

शिर्डी दौऱ्यात जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नसल्याचा आरोप मोदींनी केला होता. ते म्हणाले होते की,”आधीच्या सरकारने शेतकर्‍यांच्या नावाने मतांचे राजकारण करणार्‍यांना थेंब थेंब पाण्यासाठी तरसावले. १९७०मध्ये या प्रकल्पाच  भूमीपूजन झालं. पाच दशकं लागली ते पूर्ण व्हायला. आता मात्र आमच्या सरकारने तेजीत काम केले. आता डावा कालवा सुरू झाला आहे. लवकरच उजवाही सुरू होईल. केंद्रात सरकारमध्ये असलेले कृषी मंत्री महाराष्ट्राचा नेता यांना व्यक्तिगत सन्मान; पण शेतकर्‍यांसाठी काय केले हे पाहणं महत्त्वाचं आहे.  60 वर्षात साडेतीन लाख कोटी रुपयांचे एमएसपी अन्नधान्य खरेदी केले. आम्ही आमच्या कार्यकाळात साडेतेरा लाख कोटीचे एमएसपी धान्य खरेदी केले. १ लाख १५ हजार कोटी दलालांच्या खाती दिले. ते कृषीमंत्री असताना पैशासाठी दलालांच्या भरवाशावर रहावे लागत होते. पैशासाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. आमच्या सरकारने थेट बँक खात्यात पैसे दिले.

हेही वाचा 

Back to top button