मुंबई: जेवणापूर्वीच महिलेला १ लाख ८८ हजारांचे बील | पुढारी

मुंबई: जेवणापूर्वीच महिलेला १ लाख ८८ हजारांचे बील

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: प्रीबुकींगवर पंधरा टक्के सूट देण्याच्या नावाने एका महिलेकडून तिच्या क्रेडिट कार्डसह सीव्हीही आणि ओटीपी क्रमांक प्राप्त करुन अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. जेवणापूर्वीच १ लाख ८८ हजारांचे बिल वसूल करुन सायबर ठगाने या महिलेची फसवणूक केली होती.

४३ वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरीतील ओशिवरा परिसरात राहते. ३० जुलैला जेवणासाठी ती गुगलवर हॉटेल शोधत असताना तिला सारा स्टार नावाच्या हॉटेलचा मोबाईल क्रमांक सापडला.

या मोबाईलवरुन संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने तिला प्रीबुकींग केल्यास त्यांना पंधरा टक्के सूट मिळेल, त्यासाठी तिला आधी दीड हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. यावेळी त्याने तिच्याकडे तिच्या क्रेडिट कार्डसह सीव्हीही क्रमांक, एक्सपायरी डेटची मागणी केली. तिनेही त्याला सर्व माहिती शेअर केली होती. त्यानंतर तिच्या पतीच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक आला. तिने त्याला तो ओटीपी क्रमांक शेअर केला. त्यानंतर तिच्या कार्डवरुन १ लाख ८७ हजार ९५९ रुपये डेबीट झाले. अशा प्रकारे जे- वणाच्या बुकींगसाठी अज्ञात सायबर ठगाने काही मिनिटांत १ लाख ८८ हजार ४५९ रुपयांचा अपहार करुन तिची फसवणूक केली. यानंतर तिने ओशिवरा पोलिसांत संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगाचा शोध सुरु केला आहे.

हेही वाचा 

Back to top button