मुंबई : पनवेलमध्ये सिमेंटचा बेंच अंगावर पडून चार वर्षीय मुलीचा मृत्यू! | पुढारी

मुंबई : पनवेलमध्ये सिमेंटचा बेंच अंगावर पडून चार वर्षीय मुलीचा मृत्यू!

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : गार्डनमध्ये बसवण्यात आलेला सिमेंटचा बेंच अंगावर पडून एका 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना  खरघरमध्ये आज घडली. या मुलीच्या मृत्यूमुळे खारघरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्रिजा विश्वकर्मा (वय 4 वर्ष रा. खारघर) असे मयत पावलेल्या 4 वर्षीय मुलीचे नाव आहे. ब्रिजा आपल्या वडिलांना घेऊन खारघर मधील एका गार्डनमध्ये गेली होती. यावेळी  ब्रिजाचे वडील प्रकाश विश्वकर्मा हे गार्डनमधील एका सिमेंटच्या बाकड्यावर बसले. यावेळी ब्रिजा याच गार्डनमध्ये खेळत होती, खेळताना ब्रिजा ही गार्डनमधील सिमेंटच्या बाकड्यावर बसायला गेली, बाकड्यावर बसायचा प्रयत्न करत असताना हा बाकडा खाली पडला. दुर्दैवाने ब्रिजा बाकड्याच्या खाली अडकली. यावेळी वडील प्रकाश विश्वकर्मा धावत गेले आणि बाकडा बाजूला करण्याचा प्रयत्न केला. बाकडा बाजूला करेपर्यंत तिचा जीव गेला होता, बाकडा बाजूला केल्यानंतर तिला उचलून जवळील दवाखान्यात घेऊन गेले, मात्र ती मृत झाल्याची माहिती डॉक्टरने दिल्यानंतर त्याच्या पायाखालची वाळू सरकली. या घटनेमुळे खारघरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

Back to top button