म्हाडाच्या मुंबईतील ४०८३ घरांसाठी सोडत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पाडणार | पुढारी

म्हाडाच्या मुंबईतील ४०८३ घरांसाठी सोडत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पाडणार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून मुंबईमधील विविध गृहनिर्माण योजना अंतर्गत घरांसाठी आज (दि. 14) सोडत होणार आहे.

ही सोडत नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील सभागृहात सकाळी 11.30 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. या विक्रीची सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पाडणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होती

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून 22 मे रोजी 4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मुंबईमधील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील घरांच्या विक्री होणार आहे. आज १ लाख 20 हजार 144 पात्र अर्जाची सोडत होणार आहे.

.हेही वाचा 

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पटोले – उद्धव ठाकरे यांची भेट

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर पुन्हा वाहतूक कोंडी; वाहनचालक मेटाकुटीला

कोल्हापूर जिल्ह्यात ‘एनआयए’चे छापे

 

Back to top button