भ्रष्टाचाराबाबत आण्णा हजारेंनी आंदोलन करावं : संजय राऊत | पुढारी

भ्रष्टाचाराबाबत आण्णा हजारेंनी आंदोलन करावं : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांनी सरकारमध्ये जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यातील सरकार भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात खरी आंदोलनाची गरज आता आहे. आण्णा हजारेंनी या भ्रष्टाचाराविरोधात आपली भूमिका मांडून आंदोलन करावं. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आज (दि.२३) माध्यमांशी ते बोलत होते.

“मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेनेत बेईमानी करून सरकारमध्ये जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांवर हजारो कोटी रूपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले या सरकारमध्ये सामील झाले आहेत. भाजपमध्ये जाऊन भ्रष्टाचारी शुद्ध झालेत. भ्रष्टाचार विरोधात लढणारे म्हणून आण्णा हजारे यांची देशात ओळख आहे. आण्णांना हात जोडून विनंती आहे की, हा देश वाचवायचा आहे. त्यासाठी आज खरी आंदोलनाची गरज आहे, त्यांनी आंदोलन करावं,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. ” मुख्यमंत्री काही दिवसांनी जो बायडनला भेटायला जातील, ऋषी सुनकलाही भेटायला जातील. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत, असे त्यांचेच लोक सांगतात,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

“शिंदे मुख्यमंत्री असल्यानेच त्यांच्या आमदारांना निधी दिला जात आहे. पण जो पक्षात येईल त्यालाच फक्त विकासकामांसाठी विकास नीधी दिला जातो हे धोरण घातक आहे,” असेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button