‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ एसटीच्या योजनेला प्रवाशांचा उत्साही प्रतिसाद | पुढारी

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ एसटीच्या योजनेला प्रवाशांचा उत्साही प्रतिसाद

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा ; रायगड जिल्ह्यातील छोटे व्यापारी, उद्योजक, छोटे विक्रेते अशा अनेकांना कामांनिमित्त सलग काही दिवस एसटीचा प्रवास करावा लागतो. अनेक हौशी पर्यटक आठवड्याची सुट्टी घेऊन मनसोक्त भ्रमंती करतात. अशा प्रवाशांसाठी असलेल्या ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. 1 एप्रिल 2023 पासून 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षात तब्बल 683 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांच्या हितासाठी विविध प्रवास योजना आणि उपक्रम राबवण्यात येतात. यापैकीच एक असणार्‍या ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ या योजनेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून 1?एप्रिल 2023?पासून 31?मार्च 2024?पर्यंत तब्बल 683?प्रवाशांनी प्रवास करीत अलिबाग आगाराच्या तिजोरीत 9 लाख 19 हजार 315 रुपयाचे उत्पन्न जमा झाले असल्याची माहिती रायगड विभाग नियंत्रक घोडे यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड, कर्जत असे आगार आहेत. या योजनेत सर्वाधिक 232 पास हे अलिबाग आगारातून गेले असून त्याच्या विक्रीतून 3 लाख 19 हजार 275 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.?तर मुरुड आगारात सर्वात कमी म्हणजे केवळ चार पासची विक्री होत त्यातून चार हजार सहाशे ऐंशी रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांच्या हितासाठी विविध प्रवास योजना आणि उपक्रम राबवण्यात येतात. यापैकीच एक असणार्‍या ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ या योजनेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आवडेल तिथे कोठेही प्रवास’ ही योजना 1988 पासून सुरू करण्यात आली आहे.?प्रवाशांशी जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे नाते निर्माण व्हावे, तसेच पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे अशा ठिकाणी कमी खर्चात प्रवास करता यावा, यासाठी ही योजना आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

आंतरराज्य वाहतुकीसाठी महाराष्ट्राच्या एसटी सेवा जेथपर्यंत जातात तेथे पास वैध राहील. या योजनेतील सर्व प्रकारचे पास एसटी महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील. पासधारकास आरक्षण आकार भरून आसन आरक्षित करता येईल. पासधारकास आपल्या सोबत विनामूल्य 30 किलो (मुलांसाठी 15 किलो) वजनाचे सामान नेता येईल. उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीस वैध राहील. स्मार्टकार्ड धारकाकडील स्मार्ट कार्ड वाहकाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीनला लावून स्मार्ट कार्डची वैधता तपासता येते व त्यानुसार मशीनमध्ये प्रवाशांची नोंद होऊन प्रवाशास प्रवास करता येतो.

योजनेंतर्गत 7 दिवसांचा पास दिला प्रवाशांना
1298 रुपयांत 7 दिवस प्रवासाची दिली संधी

Back to top button