Sharad Pawar rules Google Trend : निवृत्तीच्या घोषणेनंतर गुगल आणि ट्विटरवर फक्त शरद पवारांचीच चर्चा; IPLपडले मागे | पुढारी

Sharad Pawar rules Google Trend : निवृत्तीच्या घोषणेनंतर गुगल आणि ट्विटरवर फक्त शरद पवारांचीच चर्चा; IPLपडले मागे

Sharad Pawar Resigns : देशभरातून गुगलवर शरद पवारांचा सर्च | Sharad Pawar rules Google Trend

पुढारी ऑनलाईन : (Sharad Pawar rules Google Trend) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा मुंबईत केली. लोक माझे सांगाती, या त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनावेळचे त्‍यांनी ही घोषणा केली आहे. या घोषणेनंतर गुगलवर शरद पवार यांच्यासंदर्भातील बातम्या शोधण्यासाठी नेटिझन्सनी धाव घेतली, आणि काही मिनिटांत गुगल ट्रेंडवर शरद पवार हा भारतातील नंबर एकचा ट्रेंड बनला. विशेष म्हणजे गेले काही आठवडे आयपीएलने गुगल व्यापून टाकलेले असताना, आजचा दिवस मात्र शरद पवारांचा ठरला.

पक्षाध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा त्यांनी केल्यानंतर भारतातून मोठ्या प्रमाणावर गुगलवर शरद पवार हा सर्च सुरू झाला. विशेष म्हणजे देशांतील सर्वच राज्यातून हा सर्च सुरू होता. तसेचे ट्विटरवरही अनेक जण शरद पवारांच्या या निर्णयावर लिहू लागले आणि त्यातून ट्विटर ट्रेंडवरही शरद पवार भारतातून क्रमांक एकवर होते.  (Sharad Pawar rules Google Trend)

शरद पवार, Sharad Pawar Resigns, Latest News Sharad Pawar अशा विविध प्रकारे हा सर्च सुरू होता. विशेष म्हणजे अनेकांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्याचा पत्ताही शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला.

पवारांच्या घोषणेनंतर कार्यकर्ते भावूक

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अजित पवारांनी व्यासपीठ सोडण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, मी फक्त पदावरून बाजूला झालो आहे. मी तुमच्या सोबत कायम आहे. यापुढे ही सार्वजनिक जीवनात सक्रिय राहणार आहे. सर्व कार्यक्रमांना मी तुमच्यासोबत हजर असेन, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button