Mumbai Municipal Corporation शाळांची घंटा वाजणार ! | पुढारी

Mumbai Municipal Corporation शाळांची घंटा वाजणार !

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तसे अधिकृत परिपत्रक बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेतील वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी शिक्षण विभागाला दिले आहे.

मुंबई शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिका शाळा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पालिका प्रशासनाने (Mumbai Municipal Corporation) 4 ऑक्टोबरपासून इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र शाळा सुरू करताना काही निर्बंधही लादण्यात आले आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी महापालिकेसह खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील वर्गांमध्ये निर्जंतुकीकरण बंधनकारक केले आहे.

कोविड सेंटर व रेल्वे स्टेशनवर कोरोना प्रमाणपत्र पडताळणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना तेथून कार्यमुक्त करावे.

सुरु होणाऱ्या शाळा महापालिकेच्या आरोग्य केंद्राची सलग्न कराव्यात, असे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करावे, असेही परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Back to top button