टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतरही रोहित शर्माने केली जबरदस्त पोस्ट | पुढारी

टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतरही रोहित शर्माने केली जबरदस्त पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क

सध्या क्रिकेट वर्तुळात टीम इंडियातील वाद आणि आयपीएल या दोनच गोष्टींची जोरदार चर्चा सुरु आहे. विराट कोहलीने टी२० वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार अशी घोषणा केल्यानंतर एक एक करुन टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. दरम्यान, या सगळ्या नकारात्मक वातावरणात रोहित शर्माने केलेली इन्स्टाग्राम विशेष पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

सध्या युएईमध्ये आयपीएलचा उर्वरित १४ वा हंगाम खेळवण्यात येत आहे. त्यानंतर काही दिवसांतच तेथे टी २० वर्ल्डकप सुरु होणार आहे. सध्या आयपीएल हंगाम त्याच्या शेवटाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे टी २० वर्ल्डकपचा फिव्हर चढण्याची अपेक्षा आहे. याच दरम्यान, रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली.

त्याने भारताने २००७ मध्ये खेळला गेलेला पहिला टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतरचा फोटो पोस्ट केला. या पोस्टला त्याने एका पोस्टची जोड दिली आहे. या पोस्टद्वारे आम्ही या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आमचे सर्वस्व पणाला लावू अशी ग्वाही दिली.

रोहित शर्मा आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘२४ सप्टेंबर २००७ जोहान्सबर्ग या दिवशी लाखो लोकांचे स्वप्न सत्यात उतरले होते. कोणाला वाटले होते की तुलनेने कमी अनुभवी आणि तरुण टीम इंडिया असा इतिहास घडवेल! याला आता १४ वर्षे झाली आहे. तेव्हापासून आम्ही खूप पुढे आलो आहोत. आम्ही अनेक इतिहास रचले आहेत, आम्हाला काही धक्केही सहन करावे लागले. आम्ही संघर्ष केला पण आम्ही धीर सोडला नाही. आम्ही माघार घेतली नाही. आम्ही आमचे सर्वस्व दिले.!’

‘आता यंदाच्या आयसीसी टी२० वर्ल्डकपमध्ये संघातील प्रत्येकजण २००७ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. इंडिया हा इतिहास घडवू या मी जिंकण्यासाठी जात आहे. #InItToWinIt’ त्याने या पोस्टद्वारे #InItToWinIt हा हॅशटॅग सुरु केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

रोहित शर्माच्या मनात अजूनही ‘ती’ सल कायम  (टीम इंडियातील वाद )

२००७ च्या टी२० वर्ल्डकपनंतर भारताने २०११ चा एकदिवसीय वर्ल्डकपही जिंकला होता. मात्र या संघात रोहित शर्माचा समावेश नव्हता. याची सल रोहितच्या मनात अजूनही कायम आहे. आता यंदाचा टी२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी रोहित शर्मा आतूर आहे. २००७ च्या टी२० वर्ल्डकप विजेत्या संघात रोहित शर्माचा समावेशे होता. याच वर्ल्डकपदरम्यान त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरु झाली होती.

टी२० वर्ल्डकप येत्या १८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. २५ ऑक्टोबरला भारत – पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियातील वाद बाजूला सारून सर्व खेळाडू एकदिलाने टी२० वर्ल्डकपमध्ये खेळावेत अशी सर्वच क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.

हेही वाचले का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress
 

Back to top button