क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्जच्या स्विमिंग पूलमधील फोटोवर हॉकीपटू श्रीजेशची कमेंट - पुढारी

क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्जच्या स्विमिंग पूलमधील फोटोवर हॉकीपटू श्रीजेशची कमेंट

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताची महिला क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्ज सध्या ऑस्ट्रेलियामध्ये घाम गाळत आहे. जेमिमाह क्रिकेटच्या मैदानाबरोबरच सोशल मीडियाच्या दुनियातही चांगलीच प्रसिद्ध आहे. ती टीम इंडियाबरोबर टूरवर असताना अनेक फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर करत असते.

तिचे हे व्हिडिओ आणि फोटो कायम चर्चेचा विषय असतात. सध्या तिचा एक स्विमिंग पूलमधील फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोवर क्रिकेट चाहत्यांशिवाय भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आणि गोलकिपर श्रीजेशलाही कमेंट करण्याचा मोह आवरला नाही.

ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगसाठी भारताची महिला क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्ज ऑस्ट्रेलियात घाम गाळत आहे. यादरम्यान, तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला स्विमिंग पूलमधील एक फोटो शेअर केला. या फोटोत ती आपल्या फिटनेसवर किती काम करत आहे याची झलक दिसते.

क्रिकेटर जेमिमाहयाच फिटनेसबाबत हॉकीपटू श्रीजेशने कमेंट केली. त्याने ‘सिक्स पॅक्स लवकरच तयार होतील’ अशी कमेंट केली होती. त्यावर जेमिमाहने प्रतिक्रियाही दिली. जेमिमाह रॉड्रिग्जने श्रीजेशला टॅग करत ‘त्याच्यावरच काम सुरु आहे अण्णा’ अशी प्रतिक्रिया दिली.

क्रिकेटर जेमिमाह डान्सिंगमध्येही भारी

क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्ज आपल्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या क्रिकेटिंग स्टाईल बरोबरच तिचे डान्सिंगचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. भारतीय महिला क्रिकेट संघातील जेमिमाह ही एक महत्वाची खेळाडू आहे.

जेमिमाह रॉड्रिग्जला नुकतेच मेलबर्न लेनेगेड्जने करारबद्ध केले आहे. ती आता हरमनप्रीत कौरबरोबर या संघात सामील झाली आहे. याचबरोबर महिला बिग बॅश लीगमध्ये स्मृती मानधाना आणि दिप्ती शर्माही सिडनी थंडर कडून खेळणार आहेत. तर शेफाली वर्मा आणि राधा यादव या दोघी सिडनी सिक्सरकडून खेळणार आहेत.

हेही वाचला का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button