Aaditya Thackeray News : स्वत:ला विकलं ते पुरे झालं; मुंबईला विकू नका – आदित्य ठाकरे | पुढारी

Aaditya Thackeray News : स्वत:ला विकलं ते पुरे झालं; मुंबईला विकू नका - आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमच्या विकासकामावर शिंदे-फडणवीस आपला फोटो लावतात. ४०० किलोमीटरच्या रस्त्याचा प्रस्ताव कोणी मांडला. ६०० कोटीचं बजेट असलेला हा प्रकल्प कसा दाखवणार, याला पैसा कुटून आणणार. ४०० किमीचे रस्त्याच्या  कामासाठी काही वेळेची डेडलाईन दिली आहे का नाही? असे प्रश्न उपस्थित करत शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray News) यांनी माध्यमांशी बोलताना आज शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले.

दादरच्या शिवसेनाभवनात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, ” मी केलेल्‍या आरोपानंतर मुंबई पालिकेनं पत्र काढलं. ४०० किलोमीटर  रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला?  सहा हजार कोटी रुपयांचे रस्ते प्रशासकाने स्वत: मंजूर करणे हे कितपत योग्य आहे? ४०० किलोमीटर रस्त्याच्या  कामासाठी काही वेळेची डेडलाईन दिली आहे की नाही, सहा हजार कोटी बजेटमध्ये कस दाखवणार आहात आणि तो पैसा कुठून आणणार आहात, असे सवाल त्‍यांनी केले.

Aaditya Thackeray News : स्वत:ला विकलं ते पुरे झालं…

 रस्त्यासाठी एवढा मोठा निधी कितपत योग्य आहे?, ४०० किमी रस्त्याला ४ ते ५ वर्षे  लागणार. मुंबईकरांचा पैसा लुटला जात आहे.  लोकांच्या पैशाचा चुराडा केला जात आहे, स्वत:ला विकलं ते पुरे झाल; मुंबईला विकु नका आता, गद्दारांची टोळी हात मारुन जाईल; पण मुंबईचं हाल होतील, असेही अदित्‍य ठाकरे म्‍हणाले.

हेही वाचा

Back to top button