Hasan Mushrif : सोमय्यांनी अंबाबाईचं दर्शन घ्यावं अन् कोल्हापुरातील माझ्या कामाची माहितीदेखील घ्यावी; हसन मुश्रीफांचे आव्हान | पुढारी

Hasan Mushrif : सोमय्यांनी अंबाबाईचं दर्शन घ्यावं अन् कोल्हापुरातील माझ्या कामाची माहितीदेखील घ्यावी; हसन मुश्रीफांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : किरीट सोमय्यांनी कोल्हापूरात यावं, अंबाबाईचं दर्शन घ्यावं अन् त्यांनी जिल्ह्यातील कामाची माहिती घ्यावी असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांना दिले आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर पुन्हा काहीतरी बोलून मला त्यांना डिवचायचं नसल्याचेही मुश्रीफ म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) आणि पुणे येथील घरांवर ईडीने छापे टाकले. यांनंतर प्रथमच माध्यमांसमोर येत मुश्रीफ यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी संबंधित ईडी कारवाई दरम्यान  यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे आणि गडहिंग्लज कारखान्यातील आर्थिक घोटाळ्याबाबत आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरला ट्विट करत २०२३ या नव्या वर्षात आपले नवे निशाणे कोण असणार याची माहिती दिली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुढे ते म्हणाले, माझ्यावर झालेल्या आरोपांवर चौकशीदरम्यान मी सर्व खुलासे केले आहेत. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा काही दोष नसतो. सरकारी अधिकारी कोणाच्यातरी सांगण्यावरून येतात. त्यामुळे ईडी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. छापासत्र सुरू असताना, अनेक कार्यकर्ते माझ्या निवास्थानी १२ ते २४ तास उपस्थित होते. ते त्यांचे माझ्यावरील प्रेम आहे. त्यांनी मला दिलेल्या पाठिंब्यामुळे मी आभारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

 

Back to top button