कर्नाटकात बोलावून हल्ला करण्याचा कट : संजय राऊतांचा आरोप | पुढारी

कर्नाटकात बोलावून हल्ला करण्याचा कट : संजय राऊतांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या छुप्या पाठिंब्याशिवाय कन्नड वेदिकेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात येवून येथील गावांमध्ये झेंडे लावणार नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झेंडे लावायला घुसलेल्यांना राज्याबाहेर घालवण्यासाठी आसामला जाऊन नवस करणार का? असा सवाल शिवेसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला. तसेच कर्नाटकात बोलावून हल्ला करण्याचा कट रचला असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

महाराष्ट्रात आतापर्यंत असं घडलं नव्हतं पण मानसिकदृष्ट्या अपंग, अस्थिर सरकार राज्यात आहे. या सरकारला पाठीचा कणा नाही महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान नाही. अशा सरकारकडू राज्याच रक्षण होईल असं वाटत नाही. काश्मिरमध्ये येवून झेंडे फडकून आमचा काश्मीर आहे, असं म्हणावे, असे महाराष्ट्रात सुरू आहे. तीन महिन्यांपासून महाराष्ट्रावरील आक्रमणे वाढली आहेत. याचा परिणाम गंभीर होईल. त्यामुळे यामध्ये लक्ष घालावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

काश्मीर फाईल हा एका पक्षाच्या प्रचारासाठी सिनेमा आहे. या चित्रपटानंतर सगळ्यात जास्त काश्मीर पंडितांच्या हत्या झाल्या. पंडितांवर हल्ला होत असताना सिनेमावाले कोठे होते, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थीत केला.

कर्नाटकात बोलावून हल्ला करण्याचा कट

३० मार्च २०१८ रोजी बेळगावात झालेल्या एका कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करून भाषिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांच्यासह तिघांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याची सूचना केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी कर्नाटकात बोलावून हत्या करण्याचा कट रचला असल्याचा आरोप करत याला न घाबरता हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button