स्वत:लाच करा व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज..नवीन फिचर भारतात उपलब्ध होणार | पुढारी

स्वत:लाच करा व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज..नवीन फिचर भारतात उपलब्ध होणार

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था :  सकाळी ऑफिसला निघताना सांगितलेली कामे न केल्याने संध्याकाळी घरी आल्यावर शिव्या खाणार्‍यांची सुटका आता व्हॉटस्अ‍ॅप करणार आहे. स्मरणात राहावी अशी कामे, नोटस्, अपडेटस् विसरू नयेत, यासाठी स्वत:लाच मेसेज करण्याची सुविधा व्हॉटस्अ‍ॅप लवकरच भारतात देणार आहे.

गेल्या महिनाभरात व्हॉटस्अ‍ॅपने काही नवीन सुविधा वापरकर्त्यांना दिल्या आहेत. त्याचाच पुढचा भाग आता भारतात उपलब्ध होईल. तो म्हणजे, स्वत:च स्वत:ला मेसेज करू शकण्याच्या सुविधेचा. कामाच्या धबडग्यात अनेक कामे विसरून जातो, कामाच्या ठिकाणी दिलेल्या सूचना, अपडेटस् कामामुळे लक्षात राहत नाहीत, असे प्रश्न असणार्‍या अनेकांना या सेवेचा फायदा होणार आहे. कामांची आठवण करून देणारा स्मरण संदेश, महत्त्वाच्या नोटस्, अपडेटस् एकत्र एकाच जागी आपल्याच इनबॉक्समध्ये ठेवता येणार आहेत. यासाठी फक्त आपणच आपल्याला मेसेज करायचा आहे.

येत्या काही आठवड्यांत अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही स्मार्टफोनसाठी हे नवीन फिचर उपलब्ध होणार आहे. या फिचरची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर काही देशांत हे फिचर देण्यात आले आहे. भारतात मात्र ते आता उपलब्ध होणार आहे.

Back to top button