मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात गोवरने एका बालकाचा मृत्यू, ५० बालकांवर उपचार, दोघांची प्रकृती चिंताजनक | पुढारी

मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात गोवरने एका बालकाचा मृत्यू, ५० बालकांवर उपचार, दोघांची प्रकृती चिंताजनक

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील पूर्व उपनगरांत वाढलेल्या गोवर या संसर्गजन्य रोगाने लहान बालकांना लक्ष्य केले आहे. रविवारी कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या तीन बालकांपैकी एका बालकाचा आज (मंगळवार) दुर्देवी मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेली ५० बालके ही चेंबूर, गोवंडी आणि मुंबई बाहेरील असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. यापैकी तीन बालके ही व्हेंटिलेटरवर होती. त्यांची सोमवारपासून प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी यापैकी एक वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कस्तुरबा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.

पुर्व उपनगरांतील एम. पुर्व विभागातील गोवंडी, चेंबूर, मानखुर्दसह या विभागातील अरुंद झोपडपट्टयांमध्ये गोवरच्या साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. १२ नोव्हेंबर रोजी गोवंडी येथील झोपडपट्टीतील एकाच घरातील तीन बालकांचा गोवरने मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. यामुळे येथील वस्त्यांमध्ये पालिकेच्यावतीने लसीकरण मोहीम सुरु असून, आतापर्यंत एम पूर्व विभागात लसीकरण एमआर १ – १२६१ आणि एमएमआर – १०५४ बालकांचे लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा :  

Back to top button