Sanjay raut : आता संघर्षाची तयारी.. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या प्रतिक्रियेनंतर काय म्हणाले राऊत | पुढारी

Sanjay raut : आता संघर्षाची तयारी.. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या प्रतिक्रियेनंतर काय म्हणाले राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी राज्यात सुरु असणाऱ्या अभूतपूर्व सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut)  यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की शिवसेना आता लढाईच्या तयारीत आहे. ट्वीटरच्या माध्यमातून होय, संघर्ष करणार असं ट्वीट करत त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

काही तासांपूर्वीच संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असे ट्विट केले होते. त्यांनंतर आता त्यांनी आता संघर्षाच्या तयारीत आहे असं मत व्यक्त केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारणात काय होईल याबद्दल तर्कवितर्क केले जात असताना राऊत यांचे हे ट्विट महत्वाचे मानले जात आहे. त्यांच्या या ट्विटमुळे मध्यावधी निवडणुकीचे संकेत मिळत आहेत.

शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी आज सकाळी (बुधवारी) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिली होती.

मी राजीनामा देणार देईन, पण…: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेनेत माजलेल्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह गेलेल्या आमदारांवर अप्रत्यक्षरित्या टीका करत माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे भावनिक विधान त्यांनी यावेळी केले.

आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदारांना भावनिक साद घातली आहे, सत्तेसाठी एकत्र आलो. शरद पवार, सोनिया गांधी यांनी विश्वास दाखवला, पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचं? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको, तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतोय, असे ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button