कोल्हापूर : पाचशेच्या बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणार्‍यास अटक

कोल्हापूर : पाचशेच्या बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणार्‍यास अटक

Published on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पाचशे रुपयाच्या बनावट नोटा बाजारात खपवण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, प्रमोद मुळीक (चंदगड) असे संशयितांचे नाव आहे. त्याच्याकडून 74 हजार रुपये किंमतीच्या 500 रुपयांच्या 148 नोटा पोलिसांनी यावेळी जप्त केल्या. संशयित आरोपी शहरातील शिवाजी पार्क परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. या बनावट नोटा त्याला बनवून देणाऱ्या दुसऱ्या संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत. मुख्य संशयितांने या नोटांची छपाई कोठे व कशी केली?, यापूर्वी किती नोटा छापल्या? ही माहिती त्याच्या अटकेनंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news