“रातोरात आमचे नगरसेवक चोरणारे काय सहकार्य करणार?” : संदीप देशपांडे | पुढारी

"रातोरात आमचे नगरसेवक चोरणारे काय सहकार्य करणार?" : संदीप देशपांडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना काही मदत लागली असती तर आम्ही केली असती असा टोला लगावला होता. त्याला मनसेचे संदीप देशपांडे यांनी ‘रातोरात आमचे नगरसेवक चोरणारे आमची काय मदत करणार? असे प्रतिउत्तर दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यानंतर अयोध्या दौरा स्थगित करण्याच्या निर्णयावर राज ठाकरे हे रविवारी पुण्यातील सभेत बोलतील, असं सांगत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेने केलेल्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘रातोरात आमचे नगरसेवक चोरणारे आमची काय मदत करणार? ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार केले, आम्हाला अटक करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यांच्याकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा ठेवावी का?’ असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button