नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकमध्ये लोहखनिजाचे (Iron ore) उत्खनन केलेल्या कंपन्यांना त्यांचा माल विदेशात निर्यात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. राज्यातील बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमकुरु या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लोहखनिजाचे उत्खनन करण्यात आलेले आहे.
(Iron ore) संबंधित प्रशासकीय विभागांनी घालून दिलेल्या अटी, शर्थीचे पालन करीत संबंधित कंपन्या लोहखनिजाची निर्यात करू शकतात, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणात केंद्राने घेतलेल्या भूमिकेचा विचार निर्णय देताना केला जात असल्याचेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. निर्यातीसाठी ई-लिलाव प्रक्रिया सक्तीची राहणार नाही. विदेशी कंपन्यांशी थेट करार करून कंपन्या लोहखनिज निर्यात करु शकतात, असे खंडपीठाने नमूद केले. नैसर्गिक संपदा कायम ठेवण्यासह पर्यावरण पतन रोखण्यासाठी कर्नाटकात लोहखनिज उत्खननावर २०१२ सालापासून बंदी आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे पूर्वी उत्खनन करण्यात आलेले लोहखनिज निर्यात करणे कंपन्यांना शक्य होणार आहे.
हेही वाचलंत का ?