Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेमध्ये काय आढळून आलं? जाणून घ्या १० मुद्दे… | पुढारी

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेमध्ये काय आढळून आलं? जाणून घ्या १० मुद्दे...

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या राष्ट्रीय स्तरावर ‘ज्ञानवापी मशीद’ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्या मशिदीमध्ये शिवलिंग, त्रिशूल आणि नंदी… सापडल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टाने मशिदीची व्हिडीओग्राफी आणि सर्वेक्षण करण्याचा सूचना दिल्या होत्या. नंतर संबंधित विभागाकडून अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालात काय आढळून आलं, ते जाणून घेऊया… (Gyanvapi Mosque)

मशिदीतील तपासातील १० मुद्दे

१६ मे रोजी आयोगाच्या कार्यवाही दरम्यान याचिकाकर्त्याने आयोगाचे लक्ष मशिदीतील पुलाकडे खेचले. ज्यामध्ये पुलाच्या खाली एक शिवलिंग असल्याचा दावा केला.

आयोगाने नगर निगमच्या मदतीने अडीच फूट उंच काळ्या रंगाची गोलाकार दगडाच्या आकाराची आकृतीचा खुलासा करताना पुलाखालील पाण्याचा स्तर कमी केला.

त्यानंतर दगडाच्या वरच्या बाजुला असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या दगडाच्या मधोमध एक छिद्र होते. त्याची उंची अर्ध्या इंचाने कमी होती.

या दगडी आकृतीचे मोजमाप करण्यात आले, तेव्हा त्याची उंची सुमारे ४ फूट आढळून आली. (Gyanvapi Mosque)

याचिकाकर्त्याने ही दगडी आकृती शिवलिंग असल्याचा दावा केला. तेव्हा विरोधी पक्षाच्या वकिलांना सांगितले की, ही दगडी आकृती केवळ पाण्याचा कारंजा आहे.

या दगडी आकृतीतून पाणी निघाल्यानंतर, त्याच्या खाली पुन्हा एक अंडाकृती संरचना सापडली. ज्या वरील बाजूस वेगळ्या धाडणीचा गोलाकार आकृतीचा आणखीच दगड सापडला. त्याचा व्हिडीओ करण्यात आला.

कार्यवाही करत असताना याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, पूर्व दिशेला वजू क्षेत्राच्या मागील बाजूस खाली जाण्याचा रस्ता आहे. त्याचे मोजमाप करण्यात आले आहे. आणखी ४ पाऊले खाली गेल्यानंतर उत्तर दिशेला ४ फूट २ इंचाची रुंद रस्ता सापडला.

मशिदीच्या वरील बाजूस असणाऱ्या सभागृहाच्या पूर्व दिशेला तीन शौचालये आहेत. त्यानंतर दक्षिण दिशेलाही तीन शौचालये आहेत. तसेच एक स्नानगृह आहेत. तेथून अंदाजे साडेचार फूट अंतरावर विहीर आहे, त्यात कुठून पाणी येत आहे, याचाही व्हिडीओ करण्यात आला आहे.

मशिदीच्या पहिल्या मजल्यावर विहिरीच्या मधोमध असणारे गोलाकार शिवलिंगाच्या खाली आणखी  आकृती अस्तित्व असल्याचा दावा करत व्हिडीओग्राफी करण्याची मागणी केली.

प्रतिवाद्यांनी त्याचा पूर्ण विरोध केलेला आहे. त्यामुळे मशिदीमध्ये भिंत सापडल्यामुळे सध्या तरी आयोगाची कार्यवाही पूर्ण करणं शक्य नाही.

पहा व्हिडीओ : ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्याशी खास गप्पा

हे वाचलंत का? 

Back to top button