धक्कादायक ! धानोरा परिसरातील घरात आढळला सडलेल्या अवस्थेत मृतदेह | पुढारी

धक्कादायक ! धानोरा परिसरातील घरात आढळला सडलेल्या अवस्थेत मृतदेह

आष्टी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धानोरा परिसरातील पिंपरखेड रोड लगत अर्धवट बांधकाम झालेल्या घरात गुरूवारी (दि.४) एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या महिलेचे अंदाजे वय ३५ ते ४५ दरम्यान असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही महिला कोण? तिचा घातपात झाला की नैसर्गिक मृत्यू झाला, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. या महिलेचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून मृतदेह मृतदेह कुजलेला असल्याने जाग्यावरच शवविच्छेदन करण्यात आले. अंभोरा ठाणे हद्दीतून कोणी महिला बेपत्ता असेल तर त्यांनी ताबडतोब माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी शोध पत्रिका पाठवण्यात आली असल्याचे अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सांगितले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक देवीदास सातव, पोलीस अंमलदार सुदाम पोकळे, सतीश पैठणे, यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

Back to top button