बीड : धारुर तालुक्यात पुराच्या पाण्याने घेतला पहिला बळी | पुढारी

बीड : धारुर तालुक्यात पुराच्या पाण्याने घेतला पहिला बळी

किल्ले धारूर (बीड) : पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील किल्ले धारुर तालुक्यात जाेरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात बोडका गावातील मुलगी पुराच्या पाण्यातून वाहून गेली. पुष्पा तिडके असे तिचे नाव आहे.

पुष्पा व तिची आई मुक्‍ता शेतामधून घराकडे येत हाेत्‍या. वेळी नदीतील पाण्याचा अंदाज लागला नाही. पुरामध्ये आई व मुलगी वाहून गेल्या सुदैवाने आई नदीच्या काठावर वाहत आली.पुष्पा पुराच्‍या पाण्‍यात वाहून गेली. दुसऱ्या दिवशी कोथिंबीरवाडी शिवारामध्ये तिचा  मृतदेह सापडला.

अधिक वाचा : 

पुराच्या पाण्याने पहिला बळी

सोमवारी  बोडखा गावात सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. गावापासून महादेव वस्तीकडे जाणाऱ्या शेतरस्त्य्यामध्ये नदी आडवी येते.

अधिक वाचा : 

मातीचा पूल वाहून गेल्याने घटना

नदीवर मातीचा पूल आहे त्याचा आधार घेत पुष्पा व आई मुक्ता तिडके दोघी घरी परत येत  हाेत्‍या. त्‍यांना नदीतील पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या वेगाने दोघी वाहत जाऊ लागल्या. मुक्ता ३०० मिटर पुढे वाहत जात काठाला पोहोचली.पुष्पा ही पाण्यात वाहून गेली.

अधिक वाचा : 

पुष्‍पा मृतदेह दुसऱ्या दिवशी मंगळवारी कोथिंबीरवाडी शिवारात ३ किमी अंतरावर आढळून आला. या घटनेमुळे तिचे कुटुंब व बोडखा गावात शोककळा पसरली आहे.

गावकऱ्यांनी त्या नदीवर पूल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्‍थांमधून हाेत आहे. उपसरपंच अशोक तिडके यांनी लवकर पूल उभारण्‍यात येईल. अशी ग्वाही दिली.

हे ही वाचा  :

हे ही पाहा :

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

स्मृती मानधना भारताची आघाडीची महिला क्रिकेटपट्टू आहे.

स्मृती मानधनाचा हा स्टायलिश फोटो व्हायरल झाला होता

स्मृती मानधना फोटो

Back to top button