

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : महागाई भत्त्यात आज वाढ करण्यात आली. कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्ष केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली नव्हती.
अधिक वाचा
लाखो केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्याच्या (डीए) वाढीच्या प्रतीक्षेत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. यावेळी 'डीए'मध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला.
अधिक वाचा
जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय कर्मचार्यांच्या डीएत चार टक्के वाढ झाली होती. आता 'डीए'मध्ये १७ टक्क्यांहून २८ टक्के म्हणजे ११ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने डीए वाढीचा निर्णय स्थगित ठेवला होता. तसेच केंद्रीय अर्थमंत्रालयाने जून २०२१मध्ये ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचार्यांना आणि ६१ लाख निवृतीधारकांच्या डीएत वाढीला स्थगिती देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते.
महागाई भत्ता हा वेतनातील हिस्सा असतो. कर्मचार्याचा एक निश्चित असे मूळ वेतन असते. देशातील वाढत्या महागाईची झळ कमी बसवी यासाठी केंद्र सरकार आपल्या कर्मचार्यांना महागाई भत्ता देते. यामध्ये वारंवार वाढ होत असते. याचा लाभ निवृत्त कर्मचार्यांनाही मिळतो.
हेही वाचलं का?