पुणे : डॉक्टर जगताप याने आठ दिवसांपूर्वी लावला होता खोलीत कॅमेरा पण… | पुढारी

पुणे : डॉक्टर जगताप याने आठ दिवसांपूर्वी लावला होता खोलीत कॅमेरा पण...

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह व शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या डॉक्टर जगताप यांने ८ दिवस आदी असा प्रयत्न केला होता. मात्र डॉक्टर जगताप याचा तो प्रयत्न फसला होता.

पहिला प्रयत्न फसला

पहिल्या प्रयत्न केला होता त्यावेळी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग झाले नव्हते. त्यामुळे त्याने परत हा प्रकार केला. डॉ. सुजित आबाजीराव जगताप (वय ४२, रा. सिंहगड रोड) असे या डॉक्टरचे नाव आहे.

अधिक वाचा : 

सुजित जगताप हा मेंदूविकारतज्ञ आहे. तो तेथील महाविद्यालयात लेक्चर घेण्यासाठी नेहमी जातो.

त्यावरुन त्याची तेथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांशी ओळख झाली होती.

विद्यार्थिनी आणि प्राध्यापक या नात्याने त्याने त्यांच्याशी बोलताना नकळत रुमच्या चावीचे ठसे घेतले होते.

अधिक वाचा :

डुप्लिकेट चावी तयार करण्यापर्यंत धाडस

त्याआधारे त्याने त्यांच्या रुमची डुप्लिकेट चावी तयार करुन घेतली होती.

पुढे त्याने ॲमेझॉनवरुन कॅमेरा असलेले बल्ब खरेदी केले. त्याचे सेटिंग कसे असते, याचे प्रात्याक्षिक त्याने स्वत:च्या घरी केले होते.

या घटने अगोदर ८ दिवसांपूर्वी त्याने या महिला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असल्याचे पाहून तयार केलेल्या बनावट चावीद्वारे खोली उघडली आणि त्यांचे स्नानगृह व बेडरुममध्ये हे कॅमेरा असलेले बल्ब लावले होते.

अधिक वाचा :

तो पुन्हा दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे त्यांच्या रुममध्ये गेला होता. त्याने ते बल्ब काढून घेतले.

त्यानंतर घरी येऊन ते पाहिले. मात्र, त्यात रेकॉर्डिंग झाले नसल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्याने ६ जुलै रोजी पुन्हा दुपारच्या वेळी त्यांच्या रुममध्ये जाऊन हे बल्ब लावले.

मात्र, यावेळी या महिला डॉक्टरांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत त्यांना माहिती दिली.

पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार नव्याने समोर आला आहे.

हे ही वाचा : 

Back to top button